Pune Crime | बॅग चोरणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांकडून ‘बेड्या’

पुणे  – जबलपूर ते पुणे एक्‍स्प्रेसने पिंपरी ते पुणे असा प्रवास करत असताना रेल्वे केडगाव ते यवतदरम्यान आल्यानंतर हॅडबॅक चोरी झाल्याची घटना 17 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सराईताला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या जवळून 140 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, एक मोबाइल असा 6 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला.

योगेश रमेश माने (27, रा. गौतमनगर, ता. दौड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे, अहमदनगर पोलीस ठाणे, दौड लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीकांत क्षीरसागर, लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेचे मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. अंतरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक वायसे- पाटील यांच्या हस्ते जप्तमाल तक्रारदारांना परत देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.