टोकियो – भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे चायनिज तैपेईच्या ताई झु यिंगने कौतुक केले आहे.
सिंधूचा पराभव झाला असला तरीही तिने ब्रॉंझपदक मिळविल्याने तिचा दर्जा कमी होत नाही. आजच्या घडीला जागतिक स्तरावर सिंधूच सर्वांत सरस खेळाडू आहे. विजय आणि पराभव होतच असतात, पण खेळाडूबद्दलचा आदर तसाच राहतो, असेही यिंगने सांगितले.
सिंधूने ब्रॉंझपदकाच्या लढतीत कडवी लढत देत यश मिळविले. ती अद्याप आणखी एक ऑलिम्पिक सहज खेळू शकते व ज्या सुवर्णपदकाने तिला टोकियोत हुलकावणी दिली ते ती पॅरिसमध्ये मिळवेल, असा विश्वासही यिंगने व्यक्त केला.