मुंबई – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्हि. सिंधू हिने पूर्वाश्रमीची बॅडमिंटनपटू व सध्याची लोकप्रीय अभिनेत्री दीपिका पदुकोणसह प्रत्यक्ष कोर्टवर सराव केला.
सिंधूसह प्रदर्शनिय साना तसेच सराव करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून त्याला लाखो चाहत्यांनी लाईक्स केले आहेत. आयुष्यातला एक वेगळाच दिवस, पीव्ही सिंधूसोबत सराव करून खूप कॅलरी बर्न केल्या, अशी कॅप्शनही दीपिकाने या पोस्टला दिली आहे. सिंधूने नुकत्याच पार पडलेल्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने ब्रॉन्झपदक पटकावले होते. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रजतपदक मिळवले होते. त्यामुळे दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारी सिंधू पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.
काही दिवसांपूर्वी दीपिका, रणवीर सिंग व सिंधू एकत्र दिसले होते. तेव्हादेखील या तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दीपिका ही सिंधूची खूप चांगली मैत्रीण असून तिने यापूर्वीही तीने सिंधूसह बॅडमिंटन खेळण्याचा सराव केला आहे. दीपिका देखील एक नावाजलेली बॅडमिंटनपटू होती. त्यानंतर सिनेसृष्टीत तीने आपला ठसा उमटवला अशला तरीही अद्याप तीला या खेळाची तीतकीच आवड आहे.
दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण भारताचे प्रख्यात बॅडमिंटनपटू होते. 1980 साली प्रकाश पदुकोण बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होते. त्याच वर्षी त्यांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीप ही अत्यंत मानाची समजली जात असलेली स्पर्धाही जिंकली होती. ही स्पर्धा जिंकणारे ते पहिलेच भारतीय आहेत. भारत सरकारने त्यांना 1972 साली अर्जुन तर, 1982 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते.