पुणे : मल्हार फिल्मस अॅण्ड एन्टरटेन्मेंटस् या संस्थेतर्फे हि आगळी वेगळी आॅनलाईन सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कोरोना च्या पार्श्वभुमिवर सुरक्षीतरित्या हि स्पर्धा पार पडली व यात चक्क सर्व स्पर्धक आपापल्या घरातूनच सहभागी झाल्या होत्या.फोटो राऊंड,टॅलेंट राऊंड व पराक्षकांसोबत व्हिडीओ काॅल द्वारे प्रश्नोत्तरांचा राऊंड असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री “सई लोकुर” व मिसेस क्विन आॅफ द वर्ल्ड “जास्मिन जाधव” यांनी या स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले.कोल्हापुर येथील “स्मृती शेटे” या “मानिनी महाराष्ट्राची” म्हणजेच द्वितीय पारितोषीकाच्या तसेच मुंबई येथील अदिती हाटे या “अनुरागीनी महाराष्ट्राची” म्हणजेच तृतीय पारितोषीक विजेत्या ठरल्या. तन्वी हेडाऊ यांना “सुंदर स्मितहास्य म्हणून बक्षीस देण्यात आले.
डिजीटल प्रभात या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक होते. पुण्यातील धनकवडी परिसरातील श्री लक्ष्मी ज्वेलर्स यांच्या तर्फे “स्वामिनी महाराष्ट्राची” ला सोन्याची नथ पारितोषीक म्हणून देण्यात आली तसेच कोस्टा रिका ईको व्हिलेज चे पासेस हि देण्यात आले.सह्याद्री अॅग्री टुरिजम तर्फे फॅमिली पॅकेज “मानिनी महाराष्ट्राची” विजेती ला देण्यात आले.