मुंबई : मुंबई वरून पश्चिम बंगालच्या दुर्गापूरकडे जाणाऱ्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानाला वादळाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, या वादळामुळे जवळपास 40 प्रवासी जमखी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. B737 मॅक्स या स्पाईस जेटच्या विमानात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
मुंबईवरून निघालेल्या विमानाचे पश्चिम बंगलाच्या दुर्गापरू जिल्ह्यातील काढी नझरुल इस्लाम विमानतळावर लॅन्डिंग होणार होते. मात्र या लँडिंगच्या वेळी विमानाला मोठा झटका बसला. त्यानंतर एकापाठोपाठ काही झटके विमानाला बसले.
Extreme turbulence in a flight between Mumbai to Durgapur. I can feel what's going on in the minds of passengers when oxygen masks are coming down.
Airline was SpiceJet. Again it was B737 MAX.
Never travelling in this aircraft.
But thankfully no major accident. 🙏#SpiceJet pic.twitter.com/j7225Ag0UZ— Yuvraj Sharma (@SharmaYuv1) May 1, 2022
दरम्यान, हे झटके इतके भीषण होते, की विमानाच्या आतमध्ये ठेवलेले सामान प्रवाशांच्या डोक्यावर पडून काही प्रवासी जखमीही झाले. जवळपास 40 प्रवाशांना टर्ब्युलन्समुळे जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
The flight was about to land at Durgapur airport when the aircraft began to hobble as the flight experienced massive turbulence following extreme bad weather. Few passengers were severely injured during this major mid-air turbulence: Akbar Ansari, a passenger pic.twitter.com/3R52Kb2zXD
— ANI (@ANI) May 1, 2022
दरम्यान, या घडलेल्या प्रसंगामुळे सगळेच प्रवासी गोंधळू गेले होते. यावेळी ऑक्सिजन मास्कही या झटक्यांमुळे खाली आले होते. हा सगळा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ यावेळी टळला. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून 10 प्रवाशांना गंभीर जखम झाली आहे.वाईट हवामानाचा फटका या विमानाला बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.