मुंबई – 100 दिवस, 17 सदस्य आणि एक ट्रॉफी! ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला आहे. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती आहे की? विजेता कोणी एकच असणार आहे. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासूनच सुरुवात केली. सध्या देशाच्या प्रत्येक घरात आणि कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस 16 ची चर्चा रंगत गेली.
मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. मराठमोळा शिव ठाकरे या यादीत नंबर वन आहे का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असतानाच आता शिव ठाकरेला चक्क महाराष्ट्राच्या राजकारणातील एका बड्या नेत्याने पाठिंबा दर्शवला आहे.
मराठमोळ्या शिव ठाकरेचे नाव ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर कोरले जावे, अशी इच्छा त्याचे चाहते व्यक्त करतायंत. शिवाय काही दिवसांपूर्वी त्यांच्या समर्थनार्थ रॅलीही काढण्यात आली होती. आता शिवला आमदार बच्चू कडूंनही पाठिंबा दर्शवला. त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत असून, सध्या सोशल मीडियावर याच पोस्टची चर्चा रंगली आहे.
येत्या 12 फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉस 16’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. आणि अश्यातच आमदार बच्चू कडूंची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. बच्चू कडू आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, ‘अतिशय सामान्य कुटुंबातुन अमरावती येथील शिव ठाकरे बिग बॉस हिंदीच्या फायनलपर्यंत पोहचला आहे.’ त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये शिवला वोट करण्याचेही आवाहन केले. कडू यांनी ही पोस्ट शेअर करताना शिवचा पान टपरीवरील एक फोटो शेअर केला असून, शिवच्या वडिलांची ही पान टपरी असल्याचं दिसून येत आहे.