‘…तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते’

बच्चू कडू केली मोदी सरकारवर कडाडून टीका

मुंबई – भारतात करोना विषाणूचा हाहाकार दिसून येत आहे. करोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. आता कोविड-19चा नवा स्ट्रेन प्रथम भारतात आढळला.  त्यामुळे चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्यांनी त्या बजावल्या नाहीत. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर, आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते

दरम्यान, बच्चू कडू यांनी अहमदनगरला प्रहार कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. त्यासोबतच राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.