…म्हणून शेतकरी म्हणतोय धन्यवाद ! महाविकास आघाडी सरकार

शेतकऱ्याचा भावूक व्हिडियो बच्चू कडूंनी केला शेअर

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीची घोषणा केली होती. या कर्जमाफीनंतर राजकीय वर्तुळात कर्जमाफीबद्दल उलटसुलट चर्चा होत असल्यातरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विटरवर कर्ज माफी मिळालेल्या शेतकऱ्याचा भावूक व्हिडियो शेअर करत महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद केले आहे.

बच्चू कडू यांनी ट्विट केले आहे,’एसटीमध्ये रडणाऱ्या व्यक्तिला कारण विचारल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत बोलला 2 लाख कर्ज होते. आज माफ झाले धन्यवाद महाविकास आघाडी सरकार.., असं ट्वीट करत व्हिडियो शेअर केला आहे या व्हिडियोमध्ये एक शेतकरी रडताना दिसत असून त्याला रडण्याचे कारण विचारले असता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे तो सांगतो. कर्ज उरावर बाळगताना झालेल्या वेदना आणि आता कर्जमाफ झाल्यानंतर शेतकऱ्याचे पानावलेले डोळे सर्व काही सांगून जात आहेत.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफी संदर्भात आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.