नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान मुलांवर असलेले प्रेम आता काही लपून राहिलेले नाही. जेव्हा केव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हा पंतप्रधान मोदी अगदी मनमोकळ्यापणाने मुलांवर प्रेम करताना दिसले आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी देखील पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर त्यांना भेटायला आलेल्या एका छोट्या दोस्ताचा फोटो शेअर केला.
https://www.instagram.com/p/B0QPjPLFlUo/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोखाली मोदींनी म्हटले आहे की, खास दोस्त मला भेटायला आला आहे. या फोटोत मोदी या खास दोस्ताशी खेळताना देखील दिसत आहेत.
मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी संसदेत मध्य प्रदेशचे खासदार सत्यनारायण जटिया आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा, सून व नातू देखील होते. यावेळी मोदींनी त्यांच्या नातवाला आपल्याजवळ घेतले होते. या भेटीनंतर मोदींनी त्याच्याबरोबर खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.