नाशिक – येथील नाशिकरोड परिसरात सोमवारी दुपारी आठ महिन्याच्या बाळाने खेळता-खेळता बेबी नेलकटर गिळल्याची घटना घडली. आईच्या लक्षात येताच बाळाला नातेवाईकांनी आडगावच्या मेडिकल काॅलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळाचा जीव वाचवला आहे.
आशिष शिंदे (वय 8 महिने) असे बाळाचे नाव आहे. दुपारच्यावेळी घरात खेळत असताना आशिषने नेलकटर गिळले होते. नेलकटर गळ्यात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. नातेवाईकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी नेले. डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून अथक परिश्रमानंतर नेलकटर बाहेर काढण्यास यश आले. नेलकटर बाहेर येताच नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला कुठेही इजा झाली नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.