कपिल शर्माच्या घरी कन्यारत्न !

मुंबई – कॉमेडी किंग  कपिल शर्मा  गिन्नी आणि १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.

 

View this post on Instagram

 

Happy birthday mumy 🎉🥳🎊V luv u sooo much…Stay Happy n Healthy always 🤗 @kapilsharma

A post shared by Ginni Chatrath (@ginnichatrath) on


दरम्यान, कपिल आणि गिन्नीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे, कारण या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. खुद्द कपिलनेच ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देत आपल्या आणि गिन्नीच्या जीवनात एक कन्यारत्न आल्याचं जाहीर केलं. ‘तिला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे…. जय माता दी’, अशा शब्दांत त्याने एक ट्विट केलं.


कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

 

View this post on Instagram

 

Just 🙄 #work #shooting #comedy #fun #laughter #tv #television #tkss #thekapilsharmashow #movies #mumbai #india 🤗🙏

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.गतवर्षी त्याने गिन्नीसोबत लग्न केले. त्यापूर्वी दीर्घकाळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कपिलने या रिलेशनशिपबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. अखेर 2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याने हे नाते जगजाहिर केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)