नवी दिल्ली : भारताची धाकड गर्ल अशी ओळख असलेली महिला कुस्तीपटू आणि काॅमनवेल्थ गेम्स २०१० मधील सुवर्णपदक विजेती गीता फोगट हिने मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने स्वत: ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून ही माहिती आहे. या फोटोमध्ये गीता, तिचा पती पवन कुमार आणि त्यांचे गोंडस बाळ दिसत आहे. यानंतर त्यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
गीताने फोटो ट्विट करताना लिहिलेय की, ” हॅलो बाॅय, या जगात तुझ स्वागत आहे. तो येथे आहे. खूप चांगलं वाटतय. तुम्हां सर्वाचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. आता याने आमचं आयुष्य परिपूर्ण बनवल आहे. आई झाल्यानंतरच्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.”
HELLO BOY !! WELCOME TO THE WORLD 🥰🤗 He is here 🤗 we are so much in love ❤️ 👶🏻 please give him your love and blessings 🙏😇 he made our life perfect now 🙏👪
Nothing can be described the feelings of watching your own baby be born 😍Date – 24-12-2019 pic.twitter.com/9KAc3Ew15c
— geeta phogat (@geeta_phogat) December 24, 2019
दरम्यान, गीताने काॅमनवेल्थ २०१० गेमशिवाय जालंधर येथे २००९ मध्ये काॅमनवेल्थ चॅम्पियनशीप आणि २०११ साली झालेल्या मेलबर्न स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होतं. माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक महावीर सिंह फोगाट यांची मोठी मुलगी गीता हिने ३ वर्षापूर्वी २० नोव्हेंबरला कुस्तीपटू पवन कुमार याच्यांशी विवाह केला होता. ३१ वर्षीय गीता आणि तिच्या कुंटूबांच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ नावाचा चित्रपट देखील बनविण्यात आला आहे. यामध्ये गीताच्या वडिलांची भूमिका आमिर खान याने साकारली होती.