बाबा अखेरच्या श्वासापर्यंत वचितांच्या विकासासाठी झटले- पंकजा मुंडे

बीड: गोपीनाथराव मुंडे हे अखेरच्या श्वासापर्यंत वचितांच्या विकासासाठी झटले. वंचितांसाठी हा दिवस ऊर्जा देणारा आहे. या दिवसाचे महत्त्व पाहता गरीब बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठान आणि दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असलेल्या योजना पोहोचविण्याचा या मेळाव्याचा व प्रदर्शनाचा उददेश होता, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पांगरी येथे आल्यानंतर प्रथम चारा छावणीस भेट दिली व शेतकरी, जनावरांचे मालक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. त्यानंतर गोपीनाथगड येथील गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. त्यांनी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे आणि या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी आमदार सर्वश्री सुरेश धस, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख,सुजितसिंग ठाकूर, तानाजी मुरकुटे, लक्ष्मण पवार, मोहन फड, अतुल सावे,तुषार राठोड, श्रीमती संगिता ठोंबरे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, माधुरी मिसाळ आदीसह भारतभूषण क्षीरसागर, स्वरुप हजारी, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.