Baba Siddique death | राज्याचे माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तान याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दफनविधी पूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी अनेक नेते मंडळी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री ८.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येईल.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ते राज्यमंत्रीही राहिले आहेत तसेच ते म्हाडाचेही अध्यक्ष होते.
सिद्दीकी यांचा मृतदेह रविवारी सकाळी सहा वाजता लीलावती रुग्णालयातून कूपर रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. काल संध्याकाळी त्यांचे चिरंजीव आमदार झीशान सिद्दीकी मतदारांची भेट घेत असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात चार जणांचा सहभाग होता.
हेही वाचा: