मुंबई – बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते. या प्रकरणात त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला रविवारी अटक करण्यात आली होती.