Baba Siddique Shot Dead । अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या हत्याप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध चालू आहे. याच हत्येत आणखी एक आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आरोपींनी गोळीबार कसा केला? हत्येसाठी आरोपींनी नेमका काय कट रचला होता? हे आता समोर येत आहे.
दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हत्या प्रकरणातील पहिला आरोपी हा करनैल सिंह असून तो मुळचा हरियाणाचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचेे नाव धर्मराज कश्यप असे असून तो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे. सध्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले Baba Siddique Shot Dead ।
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कट शिजत होता. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. तसेच तीनही आरोपी बाबा सिद्धिकी बाहेर येण्याची वाट पाहात होते.
संपूर्ण घटना कशी घडली? Baba Siddique Shot Dead ।
बाबा सिद्दीकी सकाळी 9.15 ते 9.20 च्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले. यानंतर ते कार्यालयाजवळ फटाके फोडत असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. फटाके फोडत असताना अचानक कारमधून तीन जण खाली उतरले. ओळख पटू नये म्हणून हे तिघेही तोंडाला रुमाल बांधून आले होते.
यानंतर त्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळीबारात ९.९ एमएम पिस्तुल वापरण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. छातीत गोळी लागल्याने बाबा सिद्दीकी खाली पडला. यानंतर लोकांनी त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात वापरलेले पिस्तूल ९.९ मिमी कॅलिबरचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला आणि काही वेळातच दोन आरोपींना ताब्यात घेतले.
आणखी एक आरोपी करत होता मार्गदर्शन
या तीन आरोपींना आणखी एक आरोपी मार्गदर्शन करत असावा, असा पोलिसांना संशय आहे. पण तो नेमका कोण आहे? याबाबत पोलिसांना स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही. हे आरोपी मागील अनेक दिवसांपासून बाबा सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेऊन होते, असे सांगण्यात येत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या गोळ्या
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. तर डॉक्टरांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार बाब सिद्दिकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ते शुद्धीवर नव्हते. त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल नव्हती. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र सिद्दिकी यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या छातीला गोळ्या लागल्या होत्या. नियमानुसार बाबा सिद्दिकी यांच्या मृतदेहाची उत्तरीय चाचणी केली जाणार आहे.