बाबा सेहघल बॉलिवूडवर भडकला; म्हणाला हे बॉलिवूड नव्हे तर…

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील पहिला रॅप-स्टार अशी ओळख असलेल्या बाबा सेहघल याने आज रिमेक सॉंग्सच्या ट्रेंडवरून बॉलिवूडवर सडकून टीका केली आहे. बॉलीवूडने सध्या नवी गाणी बनवणं सोडून दिलं असून सध्या केवळ जुन्या गाण्यांची रिमिक्स गाणी तयार करून पैसे कमावण्याचा उद्योग बॉलिवूडमध्ये सुरु असल्याचं त्यानं म्हंटलं आहे.

“बॉलीवूडने आता जुन्या गाण्यांची रिमिक्स गाणी बनवणं सोडून द्यायला हवं. आजकालच्या हिंदी चित्रपटांमधील रिमिक्स गाणी पहिली की मला तर असा प्रश्न पडतो की आजकालच्या संगीतकारांमधील प्रतिभा संपुष्ठात आली आहे की त्यांना फक्त जुन्या गाण्यांच्या नावावर पैसे कमवायचा आहे.” असं मत त्याने मांडले.
बाबा सेहघलने यावेळी बोलताना बॉलिवूडमधील म्युझिक कंपोजर्सना देखील चांगलेच झापले असून त्याच्यामते सध्याच्या जमान्यातील म्युझिक कंपोजर्सचे काम हे ‘कीव’ करण्याजोगे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.