नवी दिल्ली- काही दिवसांपुर्वी बाबा का ढाबा चा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यासाठी अभिनेत्री रविना टंडनने मदतीचा हात मदतीचा हात मागितला होता. त्यानंतर आता रविनाने पुन्हा एक व्हीडियो पोस्ट केला आहे. त्यात एक भजी विकणाऱ्या आजीचा व्हीडियो पोस्ट केला आहे.
या व्हिडीयोत एक आजी रस्त्याच्या शेजारी बसून भजी बनवत असल्याचे दिसत आहे. त्या गेल्या ३० वर्षांपासून तेथे भजी विकत आहे. या आजी आसाममधील डुबरी येथील संतोषी मातेच्या मंदिराच्या बाहेर भजी बनवून विकण्याचे काम करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रवीनाने ‘कृपया त्यांना थोडी मदत करा’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियामुळे अनेकाची नशिबं उजाडली आहे. या आजीलाही अशीच मदत मिळावी अशी रविनाची इच्छा आहे. ती सध्या एजीएफ चॅप्टर 2च्या शुटींमध्ये व्यस्त आहे.
#Dhubri #assam #showyourlove https://t.co/pziqD01JZm
— Raveena Tandon (@TandonRaveena) October 12, 2020