चंदीगड – बलात्काराच्या आरोपावरून 20 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे, ते सध्या हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत, 3 नोव्हेंबरला होणाऱ्या आदमपूर पोटनिवडणुकीच्या अगदी आधी त्यांना हे पॅरोल मंजुर करण्यात आले आहे.डेरा प्रमुख यापूर्वी जूनमध्ये महिनाभराच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते. त्याआधी, त्यांना फेब्रुवारीमध्ये तीन आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती.
Himachal Pradesh Assembly Election: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; पाहा महत्वाच्या तारखा https://t.co/Dkw7yfxC9N
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा येथील आश्रमात दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी ते सध्या 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.
2002 मध्ये डेरा मॅनेजर रणजित सिंग याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल इतरांसह त्यांना गेल्या वर्षीही दोषी ठरवण्यात आले होते. डेरा प्रमुख आणि इतर तिघांना 16 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या हत्येसाठी 2019 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपात प्रवेश https://t.co/u08P2AtZ0K#Avdhoottatkare #bjp #shivsena
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022