पिंपरी – अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा जाब पीडित मुलीच्या वडिलांनी विचारला असता दोघांनी मिळून त्यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यात मुलीचे वडील जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी बोराटेवस्ती, मोशी येथे घडली.
आशिष रामचंद्र गालफाडे, प्रभू गालफाडे (दोघेही रा. बोराटेवस्ती, मोशी) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 12) फिर्याद दिली आहे. आरोपी आशिष याने फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. याबाबत फिर्यादी यांनी आशिष याला जाब विचारला असता आशिष आणि प्रभू या दोघांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींना समजावून सांगत असताना दोघांनी मिळून सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून फिर्यादी यांना जखमी केले.