Baaghi 4 Sanjay Dutt Look | साजिद नाडियादवालाच्या फ्रँचायझी असलेल्या ‘बागी’ सिनेमाचा चौथा भाग अर्थात ‘बागी 4’ ची घोषणा करण्यात आली होती. टायगर श्रॉफ स्टारर चित्रपटाच्या शेवटच्या तीन भागांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती आणि आता चौथ्या भागाचीही लोकांमध्ये क्रेझ वाढत आहे. नव्या पोस्टरमध्ये संजय दत्तची व्यक्तिरेखा आणि लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
या नव्या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटातील व्हिलनचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यानंतर चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त पाहायला मिळणार आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त कधीही न पाहिलेल्या खतरनाक लुकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
;
या पोस्टरमध्ये संजय दत्त खूर्चीवर बसून ओरडताना दिसत आहे. तसेच त्याच्या मांडीवर रक्तबंबाळ अवस्थेत असलेली एक मुलगी पाहायला मिळते आहे. ‘हर आशिक एक विलेन है’ असं या पोस्टवर लिहलं आहे. या पोस्टरवरून अभिनेता त्याच्या प्रेमाला गमावल्यानंतर खलनायक बनतो असा अंदाज लावला जात आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील टायगर श्रॉफचे पोस्टरही रिलीज झाले होते. ज्यामध्ये तो बाथरुममध्ये बसलेला दिसतो, त्याच्या हातात दारूची बाटली, तोंडात सिगारेट आणि हातात रक्ताने माखलेले हत्यार दिसत आहे. तर भिंतीवर रक्ताचे डाग पडलेले दिसतात. त्याच भिंतीवर ‘बागी 4’ ही अक्षरं दिसतात. यातच आता संजय दत्तचाही नवा अवतार समोर आला आहे. दरम्यान, संजय दत्त आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट पुढील वर्षी 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
‘सोनिया गांधींचे काश्मीरच्या ‘शत्रूं’शी संबंध ; भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर मोठा आरोप