नवी दिल्ली- कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरु आहे. त्यात आर्थि मदतही अनेक लोक करताना दिसत आहे. त्यातलेच एक म्हणजे अझीम प्रेमजी.
अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी तब्बल 1125 कोटी मदतीची घोषणा केली आहे. त्यांची गणना जगातील दानशूर व्यक्तींमध्ये केली जाते.
विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रित 1125 रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा प्रेमजी फाऊंडेशनचा आहे. विप्रो लि. 100 कोटी, विप्रो इंटरप्रायजेस 25 कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन 1 हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे, असं विप्रोकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगितलं आहे.
ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सीएसआर निधी अंतर्गत दिला जाणार नाही.ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सीएसआर निधी अंतर्गत दिला जाणार नाही.त्यात अनेक सुविधा पुरविल्या जातील. हा कार्यक्रम अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या 1600 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.