हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी गुरुवारी डॅनिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीने केलेला फसवणूकीचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच कंपनीविरुद्ध 100 कोटींचा मानहानी दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे.
अझरुद्दीन यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा एफआयआर केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. यात काहीही तथ्य नाही. एजन्सीने केलेले आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले.
I strongly rubbish the false FIR filed against me in Aurangabad. I’m consulting my legal team, and would be taking actions as necessary pic.twitter.com/6XrembCP7T
— Mohammed Azharuddin (@azharflicks) January 22, 2020
पुढे अझरुद्दीन म्हणाले की, लवकरच वकीलाचा सल्ला घेऊन डॅनिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स विरूद्ध 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला जाईल.
दरम्यान बुधवारी औरंगाबादध्ये डॅनिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अझरुद्दीन यांच्यावर सुमारे 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.