आझम खान यांनी ‘त्या’ वादग्रस्त वक्‍तव्यावर मागितली माफी

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदार रमा देवी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्याची आज लोकसभेत माफी मागितली आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच आझम खान यांनी लोकसभा अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडली. आपल्या कोणत्याही वक्‍तव्यामुळे जर रमा देवी यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण त्यासाठी रमा देवी यांची माफी मागतो असे आझम खान यांनी म्हटले आहे.

भाजपच्या खासदार रमा देवी यांच्यावर वादग्रस्त वक्‍तव्य केल्याने भाजपकडून या प्रकरणावर आझम खान यांच्या सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, आज आझम खान यांनी रमा देवी यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, आझम खान यांनी माफी मागितल्यानंतरही भाजपकडून सभागृहात गोंधळ करण्यात आला यावेळी खान यांनी माफी मागताना त्यांच्या हावभावावर भाजपने आक्षेप घेतला. त्यानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझम खान यांची बाजू घेत सभागृह आणि भाजपने उन्नावच्या बलात्कार पीडितेच्या अपघाताची आठवण करून दिली आणि भाजपने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)