आयुष्मान खुरानाने 500 पट वाढवले मानधन

बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आयुष्मान खुरानाला केवळ 7 वर्षे झाली आहेत. मात्र या 7 वर्षांमध्ये आयुष्मानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. “विकी डोनर’पासून त्याने करिअरला सुरुवात केली. त्यामध्ये त्याने अभिनयाबरोबरच पार्श्‍वगायनही केले होते. “बरेली की बर्फी’,”शुभमंगल सावधान’,”बधाई हो’, “अंधाधुन’ आणि “आर्टिकल 15′ सारख्या एका पाठोपाठ एक लागोपाठ हिट सिनेमे त्याने दिले आहेत.

त्यामुळे सिनेजगताला एक नवीन तारा मिळाल्याची भावना त्याच्या फॅन्समध्ये निर्माण झाली आहे. या नवीन ताऱ्याने आता आपले मानधन तब्बल 500 पट वाढवले आहे. सुरुवातीला आयुष्मान एका सिनेमासाठी 2 कोटी मानधन घेत असायचा. मात्र 2020 पासून आयुष्मान एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेणार आहे. एवढे मानधन तर हृतिक रोशन, अक्षय कुमार आणि सलमान खानच घेत असेल.

मानधनाची ही रक्कम आयुष्मान खुराना सुपर स्टार झाल्याचेच निदर्शक आहे. “ड्रीम गर्ल’च्या यशामुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. “अंधाधुन’ साठी आयुष्मानला राष्ट्रीय पुरस्कारही जाहीर झाला आहे. “ड्रीम गर्ल’च्या पाठोपाठ आयुष्मानचा “बाला’ ही येतो आहे. हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.