मुंबई – सुशांतसिंह राजपूतने नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचा सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी स्वतःच्या निराश अवस्थेतील अनुभव सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. काहींनी बॉलीवूडमध्ये कसे चुकीच्या पद्धतीने हाताळले जाते, याचे आरोपसत्र सुरू केले. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकणाबाबत चौकशी सुरु केली आहे. सोशल मीडियावर सुद्धा नेपोटीझमबाबत बॉलीवूडच्या घराणेशाहीवर युजर्सकडून चांगलीच टीका केली जात आहे.
I feel #karanjohar shud only call HIS movie actors to HIS show
Coz dare he call OUTSIDERS now,
They wont forgive him n ll expose him on his own showIn past, Few dared & they never got any offers fr his ❍#justiceforSushanthSinghRajput
Thanks @ayushmannk#BoycottKaranJohar pic.twitter.com/lRI4EDcVfP
— ChetanaBB_fan🌼No Diplomacy (@ChetanaBB_fan) June 17, 2020
यातच इंस्टाग्रामसह ट्विटरवर आयुष्मान यामध्ये आता अभिनेता आयुषमान खुरानाच्या एका पुस्तकातील काही ओळी तुफान व्हायरल होत आहेत. ‘क्रॅकिंग द कोड : माय जर्नी इन बॉलिवूड’ असं त्याच्या या पुस्तकाचं नाव आहे. २००७ मध्ये निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयुषमानला ऑडिशनसाठी कसं नाकारलं त्याचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये आयुषमान मोठा सेलिब्रिटी झाल्यानंतर करण जोहरने त्याला ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये बोलावलं. या चॅट शोमध्ये आयुषमानने करणला तो किस्सादेखील सांगितला. त्यावर करण म्हणाला, “मी तुला योग्य नंबर दिला होता. मी खरंच खूप चांगला माणूस आहे. तुझ्यामध्ये ती क्षमता आहे याची जाणीव मला तेव्हाच झाली होती.” करणच्या या उत्तरावर आयुषमाननेही खोचक टोला लगावला होता. त्या फोन नंबरद्वारे मला तुझ्यापर्यंत पोहोचायचं होतं पण ते कधीच शक्य झालं नाही, असं म्हणत त्याने करणवर उपरोधिक टीका केली होती.