सरकारचा मोठा निर्णय ! आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना फ्री मिळणार PVC कार्ड

नवी दिल्ली – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी आता आपले पात्रता कार्ड विनामूत्य प्राप्त करु शकतात. सरकारने शुक्रवारी कार्डवर आकारले जाणारे 30 रुपयांचे शुल्क माफ केले आहे. हे शुल्क लाभार्थ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरवर द्यावे लागत होते. परंतु  डुप्लिकेट कार्ड किंवा प्रिंट देण्यासाठी, लाभार्थ्यांना 15 रुपये कर वगळता सीएससी शुल्क आकारले जाईल.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सह करार केला आहे. ज्यामुळे आता लोकांना आयुष्मान भारत एन्टिलीट कार्ड विनामूल्य मिळणार आहे. या कराराअंतर्गत आता लाभार्थ्यांना पीव्हीसी आयुष्मान कार्ड मिळणार असून त्याचे वितरण ही सुलभ होईल.

PVC वर  प्रिंट होण्याने देखभाल करणे सोपे होईल
सरकारने सांगितले की, आयुष्मान कार्ड पीएम हे जेएवाय च्या कोणत्याही हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असते. NHA चे  CEO रामसेवक शर्मा म्हणाले, हे कार्ड कागदाच्या कार्डची जागा घेईल. पीव्हीसीवर मुद्रित केल्यामुळे हे कार्ड देखरेख करणे सुलभ होईल आणि एटीएमप्रमाणे लाभार्थी ते सहजपणे कुठेही आपल्या पाकीटात किंवा खिश्यात ठेवू शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्डची आवश्यकता नाही
हे कार्ड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्तीचे नाही, परंतु रूग्णांना आरोग्य सेवांमध्ये अडथळ्यांशिवाय प्रवेश मिळणे आणि कोणत्याही प्रकारची गैरवर्तन आणि फसवणूक होऊ नये यासाठी लाभार्थ्यांची ओळख पटविणे व पडताळणी करणे या यंत्रणेचा एक भाग आहे.

देशात कुठेही उपचार घेता येणार
रामसेवक शर्मा म्हणाले की, नागरिकांना हे कार्ड मोफत दिल्याने गरीबांना याचा फायदा होईल. या कार्डमुळे देशात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत उपचार घेता येतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.