आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्‌वीट करुन ही माहिती दिली. नाईक मोदी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. या अगोदर गृहमंत्री अमित शाह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही नेते रुग्णलयात दाखल आहेत. दरम्यान, लक्षणं नसल्याने नाईक यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.

नाईक यांनी ट्‌वीटमध्ये म्हटलं आहे, की, “मी आज कोरोनाची चाचणी केली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणताही त्रास नाही त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.” ते म्हणाले की, ”जे लोक मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी” मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील आतापर्यंत तीन मंत्र्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. यात सर्वात अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यांनंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोना व्हायरसचं संक्रमण झाले आणि आता आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी ट्‌वीट करुन सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.