आयुर्वेद सिटी परिवार …

रुग्णांशी नाते जोडणारा एक आगळावेगळा परिवारसंत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पहिले उभे रिंगण लोणंद ते तरडगाव (तालुका फलटण) रस्त्यावर चांदोबाचा लिंब येथे दरवर्षी भरते. अशा पुण्यभूमीवर गेली दहा वर्षापासून आयुर्वेदाची पताका घेऊन डॉक्‍टर मिलिंद काकडे (पाटील) व सौ. ज्योती काकडे (पाटील) यांनी आयुर्वेद सिटी नावाचा एक अनोखा परिवार उभा केला आहे.

डॉक्‍टर मिलिंद काकडे व ज्योती काकडे पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे अल्पावधीतच वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आयुर्वेद सिटीमध्ये पाचभौतिक चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा, केरळीयन उपचार पद्धती, एड्‌स, कर्करोग, मणक्‍याचे विकार, हृदय रोग, रक्तदाब, मधुमेह, स्थूलता आदी विविध आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. आयुर्वेद सिटीमध्ये आयुर्वेदिक दिनचर्या, सुदृढ संततीसाठी गर्भपूर्वसंस्कार, माता व बालसंगोपन, ब्युटी थेरपी, आदी सुविधाही उपलब्ध आहेत. गर्भ पूर्व संस्कारासाठी आयुर्वेद सिटीमध्ये विशिष्ट संशोधित उपचार पद्धती अवलंबली जात असून गर्भसंस्कार करून नैसर्गिक प्रसुतीसाठी उपचार देखील केले जात आहेत. आयुर्वेद सिटीमध्ये पंधराशे रुग्णांवर प्रसूती पश्चात संस्कार व गर्भसंस्कार यशस्वी करण्यात आले आहेत. फिट, पक्षाघात, मतिमंदत्व, गतीमंदत्व, निद्रानाश मेंदूचे विकार या आजारांवर शिरोधारा ही उपचार पद्धती तर मणक्‍याचे विकार असणाऱ्या दहा हजार रुग्णांवर कटी तर्पण पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. गुडघ्याचे विकार, संधिवात आदी आजारांच्या नऊ हजार रुग्णांवर आयुर्वेद सिटीमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले असून, डोळ्यांच्या विकारावर विशिष्ट उपचार पद्धतीने उपचार केले जातात. पक्षाघात असणाऱ्या तीन हजार रुग्णांवर आयुर्वेद सिटी मध्ये हे यशस्वी उपचार करण्यात आले असून आयसीयूमध्ये फरक न पडलेले रुग्ण आयुर्वेद सिटीतील उपचारानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये चालू लागले आहेत.

मसाज, स्टीम बाथ, बस्ती, नस्य, शिरोधारा, तर्पण यामुळे रुग्णांचा पॅरालीसीस पूर्ण बरा झाला आहे. हृदय रोग, मधुमेह व स्थुलता असणाऱ्या रुग्णांवर आयुर्वेद सिटीमध्ये हे यशस्वी उपचार करण्यात आले असून पांचभौतिक चिकित्सा, पंचकर्म उपचारांमुळे हे शक्‍य झाले आहे. ध्यानधारणा व योगासनांमुळे मानसिक ताण घालवून आजार कायमचे बरे करण्यात आले असून, मतिमंदत्व असणाऱ्या रुग्णांच्या जीवनात आयुर्वेद सिटीच्या माध्यमातून आशेचा किरण निर्माण झाला आहे.

आज या परिवारामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील, परदेशातील अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, मित्र या परिवारामध्ये सामील आहेत. डॉक्‍टर मिलिंद व ज्योती काकडे (पाटील) हे गेली 20 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मेंदूचे विकार विशेषतः पॅरालीसीस, मतिमंदत्व, निद्रानाश, भीती, फिट्‌स येणे, विस्मरण, कंपवात इत्यादी आजारावर व रुग्णांवर संशोधित उपचार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी बारा हजारच्या पेक्षा अधिक मेंदू विकाराच्या रूग्णांला यशस्वी चिकित्सा दिली असून तीन हजार ते साडेतीन हजार पॅरालीसीस तर साडेचार हजार मतिमंद, गतिमंद मुलांवर यशस्वी उपचार केले आहेत. मुळामध्ये आयुर्वेदाकडे लोक फार उशिरा येतात. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची शारीरिक, मानसिक ताण, आर्थिक व कौटुंबिक हानी झालेली असते. अशा वेळी रुग्णाला उपचारांबरोबरच स्नेह, प्रेम, आपुलकी दिली तरी तो रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. या संकल्पनेतूनच आयुर्वेद सिटी परिवाराची उभारणी करण्यात आली आहे. सात दिवस हॉस्पिटल ट्रीटमेंटच्या काळात रुग्णांना आयुर्वेद सिटीमध्ये घरगुती वातावरणात ठेवले जाते. तसेच घरगुती पथ्यकर तरीही रुचकर असे जेवण दिले जाते.

आयुर्वेद सिटीमध्ये रुग्णांचे वाढदिवस, त्यांच्या लग्नाचे वाढदिवस उत्साहाने साजरे केले जातात. याचबरोबर आपुलकीने, आस्थेने चिकित्सा करणारे डॉक्‍टर्स, सर्व स्टाफ यामुळे रुग्ण डिस्चार्ज होताना नकळतच आयुर्वेद सिटी परिवाराशी समरस होऊन जातो. आयुर्वेद सिटीला आत्तापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब, विधान परिषद सभापती माननीय राम राजे नाईक निंबाळकर, माजी खासदार माननीय हिंदुराव नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब, कोल्हापूर परिक्षेत्राचे आईजी विश्वास नांगरे पाटील, सातारा माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते डॉक्‍टर उजवणे, अंशुमन विचारे तसेच अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन आयुर्वेद सिटीच्या कामाचे कौतुक केले आहे. आयुर्वेद सिटीने रुग्ण सेवेबरोबरच नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे डॉक्‍टर मिलिंद काकडे पाटील व ज्योती काकडे पाटील हे इलेक्‍ट्रॉनिक्‍स व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून देखील रुग्णांना वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन करीत असतात त्यामुळेच आयुर्वेद सिटी राज्यातील रुग्णांना वरदान ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.