Ayodhya News । उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ही घटना पहाटे ५.२५ वाजता घडली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला होताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले.’
समोर आलेल्या माहितीनुसार,’25 वर्षीय शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव आहे. वृत्त लिहेपर्यंत या घटनेचे कारण समोर आले नव्हते. ही घटना उघडकीस येताच रामजन्मभूमी संकुलात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण रामजन्मभूमी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामजन्मभूमी संकुलातील आहे.