राममंदिर भूमिपूजन सोहळ्याचा मोठा आनंदोत्सव
पुणे – अयोध्या येथे झालेल्या राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव पुण्यातही मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची आरतीदेखील करण्यात आली. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
भवानी माता मंदिरात दीपोत्सव…
भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट व जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली. भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने भवानी माता मंदिरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंदिरात दीपोत्सव करण्यात आला होता. आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते पेढे वाटण्यात आले. यावेळी नगरसेविका मनिषा लडकत, माजी नगरसेवक संदीप लडकत, छगन बुलाखे, दिलीप काळोखे, आशिष जानजोत, बालम परदेशी, गणेश कांबळे, राजू काळे उपस्थित होते.
श्रीरामाचा जयघोष …
बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थितांना साखर पेढे वाटण्यात आले. यावेळी संघाचे रोहित यवतकर, माऊली रायकर, राजेश भोसले, हेमंत श्रीखंडे, समशेर शेख, बालाजी तिरमकर, राजेंद्र पंडित, प्रशांत गायकवाड उपस्थित होते. बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम आणि रामाचे परमभक्त हनुमान यांच्या वेशभूषेत बालकलाकारांनी मंदिरात आगमन करीत प्रभू श्रीरामाचा जयघोष केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पियूष शाह आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गुढी उभारून जल्लोष….
अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाल्याच्या आनंदात उद्योजक बाळूमावशी धुमाळ यांनी माण-हिंजवडी-गवारवाडी खिंडीतील राममंदिरात श्रीरामांची आरती करून प्रसाद वाटून भाविकांचे तोंड गोड केले. तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते गुढी उभारून तसेच श्री राम पूजन व आरती तसेच पेढे वाटप करून शहर कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी पक्षाचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, युवा मोर्चा संपर्क प्रमुख बापू मानकर उपस्थित होते.
प्रभू रामचंद्राची आरती…
निनाद पुणे आणि कलातीर्थ पुणेच्या वतीने भूमिपूजन समारंभानिमित्त गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खुन्या मुरलीधर चौकामध्ये अटल कट्टा येथे हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दीपोत्सव करून भीमरूपी म्हणून तसेच प्रभू रामचंद्राची आरती करण्यात आली. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक व करसेवक रवी अनासपुरे, परेश मेहेंदळे, विवेक संत, बाळा मेथे, किशोर जोगदेव, मनोहर ओक, काका देशपांडे, संजय गोखले, महेंद्र अनासपुरे, चंदू मेहेंदळे या करसेवकांच्या हस्ते आरती झाली. माजी नगरसेवक उदय जोशी, रामलिंग शिवणगे, अनिल गानू, ऍड. वैजनाथ विंचूरकर, किशोर खैराटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पाषाणमध्ये मिठाई वाटप : पाषाण परिसरात प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजर केला. यावेळी राधेश्याम शर्मा यांनी नागरिकांना मिठाई वाटप केले.
महालक्ष्मी मंदिरात फुलांची आरास…
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने राममंदिर भूमिपूजनानिमित्त महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजळून निघाले. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी मंदिराबाहेरूनच हे दृश्य अनुभविले. ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार अग्रवाल आणि अमिता अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्रीराम चौकात लाडू वाटून आनंदोत्सव साजरा
हडपसर – अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी हांडेवाडी रोडवरील श्रीराम चौकात लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
सकाळपासूनच येथे उत्साहाच वातावरण होते. येथील हांडेवाडी रस्त्यावर असलेल्या श्रीराम चौकात भगव्या झेंड्यांनी परिसर सजला होता. श्रीराम नामाचा जयघोष करत येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना लाडू वाटप करून नगरसेवक नाना भानगिरे यांनी आनंदोत्सव साजरा केला. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज यानिमित्ताने साकार होत आहे, याचा सर्वाधिक आनंद होत असल्याची भावना नगरसेवक नाना भानगिरे यांनी व्यक्त केली.
येरवड्यात पेढे वाटप
विश्रांतवाडी/येरवडा – अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीचा शिलान्यासच्या कार्यक्रम निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येरवडा भागात भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 6च्या वतीने प्रभू श्रीरामपूजनचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रभू श्रीराम तैलचित्राचे पूजन करून पेढे वाटण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष संतोष राजगुरू, रवी पांडे, प्रभाग अध्यक्ष गणेश देवकर, प्रताप मोहिते, रमेश गव्हाणे, अनिल झेंडे, राजू जाधव, सुभाष देवकर, पुनाजी जगताप, आदर्श चव्हाण, विजय पांडव, अमोल तारू, कुंतीलाल चोरडिया, प्रज्वल राजगुरू, विकास घोडके, रामा सरोदे आदी उपस्थित होते.
लोहगावात मिठाई वाटप
विश्रांतवाडी – अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणी सोहळ्याचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. त्यानिमित्त लोहगावमधील कर्मभूमीनगरमध्ये श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन, आरती व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी रामनामाचा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव शिंदे-सरकार, कर्मभूमी डेव्हलपर्सचे संचालक सुनील खांदवे-पाटील, प्रा. प्रकाश दळवी, राजेंद्र लोंढे, प्रणव त्रिपाठी, गौतमकुमार, श्री शर्मा यासह कर्मभूमीनगरमधील रहिवासी उपस्थित होते.
वानवडी परिसरात एक हजार लाडू वाटप
वानवडी – अयोध्येत रामजन्म भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त वानवडी येथील जांभुळकर चौकामध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महेश पुंडे यांनी एक हजार लाडू वाटप केले. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष महेश पुंडे, नगरसेविका कालिंदाताई पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे, नगरसेवक श्रीकांत जगताप, दिलीप काळोखे, शशिधर पुरम, उमेश शिंदे, निखिल पंचभाई, प्रवीण खेडकर, श्याम ठाकूर, नाना घोमन, अभिजित घोमन, प्रेम सकटे, अतुल भुजबळ, सागर गव्हाणे, सचिन सूर्यवंशी, मधुकर पुंडे, शक्ती येसादे आदी उपस्थित होते.