अयोध्या प्रकरण : माजी राज्यपाल कल्याण सिंह यांना समन्स

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांना आरोपी म्हणून समन्स बजावले आहे. कल्याण सिंह हे आता कोणत्याही घटनात्मक पदावर राहिले नाहीत त्यामुळे याची दखल न्यायालयाने घेतली वर त्यानुसार त्यांना आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.

9 सप्टेंबर 2017 रोजी सीबीआयच्या वतीने कल्याण सिंग यांना न्यायालयात आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान, या याचिकेत सांगण्यात आले होते की 19 एप्रिल 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातील 14 आरोपींविरूद्ध फौजदारी खटला चालविण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, राजस्थानचे तत्कालीन राज्यपाल कल्याण सिंग यांच्यावर खटला चालण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, घटनात्मक पदावर नियुक्त कल्याण सिंह यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. कल्याणसिंह यांनी 4 सप्टेंबर 2014 रोजी राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांची पाच वर्षांची मुदत 3 सप्टेंबर 2019 रोजी संपली. आता ते कोणत्याही घटनात्मक पदावर नाही, म्हणून या प्रकरणात त्याला बोलावून त्यांच्यावर खटला चालवला जावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.