#AirStrike : ‘भारत माता की जय’ ! वन्दे मातरम !

मुंबई – जम्मू-काश्मीरच्या फुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला. तसेच या  दहशतवादी भ्याड हल्ल्याचे पडसाद आता बॉलीवूडमध्ये देखील उमटत असल्याचे दिसून आले. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले आहेत. या हल्ल्यानंतर बॉलीवूडमधील कलाकारांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.  अनुपम खेर, परेश रावल, मुग्धा गोडसे, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार अशा अनेक बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना ‘भारत माता की जय’, वन्दे मातरम ! ट्विटरवरून भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.