आयशा आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; पती आरिफ तिच्यासमोरच…

अहमदाबाद – 23 वर्षीय आयशाने 28 फेब्रुवारीला अहमदाबाद येथील साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी तिने एक व्हिडीओ तयार केला हातो. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर आता आयशाच्या आत्महत्या प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. आयशाच्या वकिलाने म्हटले आहे की, तिचा पती तिच्यासमोरच गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ काॅलवर बोलत होता.

वकील जफर यांनी म्हटले आहे की, लग्न होऊन दोन महिन्यानंतरच तिचा संघर्ष सुरू झाला होता. स्वत: आरिफनेच आयशाला सांगितले होते की, तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. तरी देखील आपल्या आई-वडिलांना दु:ख होऊ नये म्हणून आयशा परिस्थितीशी लढत राहिली.

डिप्रेशनमुळे गर्भपात –
एकदा आरिफने आयशाला अहमदाबादला आणून सोडले होते. त्यावेळी आयशा गर्भवती होती. आयशाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, आरिफ ने म्हटले होते, तुम्ही मला दीड लाख रूपये द्या तेंव्हाच मी तिला घेऊन जाईल. प्रेग्नेंसी दरम्यान आरिफच्या या वाईट वागणूकीमुळे आय़शा डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे तीचा गर्भपात झाला होता.

आयशाचे वडिल लियाकत अली यांनी मंगळवारी म्हटले आहे की, आरिफच्या वडिलांना त्यांनी फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांचा कधीच फोन उचलला नाही. माझी आयशा परत येणार नाही, मात्र तिच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे. कारण अन्य कोणत्या मुलीसोबत अशी घटना घडू नये. एकदा तिच्या सासरच्यांनी तिला तीन दिवस उपाशीही ठेवले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.