मुंबई – ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे फक्त नवीनच नाही तर जुन्या कलाकारांना देखील इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना एक दोनमोठे हिट्स दिल्यानंतर इंडस्ट्रीपासून दुरावा साधला होता. त्यापैकी एक म्हणजे नव्वदच्या दशकात अक्षय कुमारची नायिका म्हणून प्रसिद्ध असलेली आयशा जुल्का, प्राइम व्हिडिओच्या एका वेब सीरिजद्वारे अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करत आहे.
नव्वदच्या दशकात नेती सिद्धार्थ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आयशाने सलमान खानच्या १९९१ च्या कुर्बान चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये करिअरला सुरुवात केली. 1992 मध्ये आलेल्या खिलाडीमध्ये आयशाने पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम केले होते. अब्बास मस्तान दिग्दर्शित हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर अक्षयला खिलाडीचा टॅग मिळाला होता.
अक्षयनंतर आयशा आमिर खानसोबत ‘जो जीता वही सिकंदर’मध्ये दिसली होती. हा चित्रपट हिट ठरला होता. आयशा पुढची काही वर्षे खूप व्यस्त होती. 1993 मध्येच, तिचे10 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी मिथुन चक्रवर्तीसोबत दलाल आणि अक्षयसोबत वक्त हमारा है हे हिट ठरले.
View this post on Instagram
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने आणि इच्छित पात्रे कमी मिळू लागल्याने आयशा मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली. 2010 नंतर, आयशाने 8 वर्षांचा दीर्घ ब्रेक घेतला आणि 2018 मध्ये अनिल शर्माच्या जिनियस चित्रपटातून ती परतली आणि आता ती हुश हुश या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.आयशासोबत या सिरीजमध्ये जुही चावला, सोहा अली खान, करिश्मा, कृतिका कामरा आणि शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.