“आयसीसी घोरावडेश्‍वर हाइक ऍण्ड बाईक’

अकराशे जण ट्रेकिंगमध्ये सहभागी

देहुरोड – इंडो सायक्‍लिस्ट क्‍लब (आयसीसी) “घोरावडेश्‍वर हाइक ऍण्ड बाईक सायकलिंग आणि ट्रेकिंग एकत्र असणारी स्पर्धा देशातील नामांकित क्रीडा, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारी संस्था इंडो सायक्‍लिस्ट क्‍लबच्या वतीने रविवारी (दि. 7) उत्साहात पार पडली. स्पर्धेचे सलग तिसरे वर्षे असून, अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सुमारे 1100 जण सहभागी होते.

सर्व सायक्‍लिस्ट स्पर्धकांना सकाळी सहा वाजता भक्‍ती-शक्‍ती उद्यान येथून झेंडा दाखवण्यात आला. या वेळी इंडो सायक्‍लिस्ट क्‍लबचे कोअर कमिटी मेंबर्स व स्वयंसेवक आणि इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्‍टर सुहास माटे, स्वानंदी सेवा ट्रस्टचे घळसासी उपस्थित होते. क्रीडा आणि पर्यावरण संदर्भात समाज प्रबोधन व काम करत असताना आयसीसीचा कार्यकर्त्यांना एक गोष्ट लक्षात आली की, शहरातील आसपासचा टेकड्या, डोंगर, उद्यानांपर्यंत लोक मोटार घेऊन जातात आणि मग पुढे ट्रेकिंग किंवा चालण्याचा आनंद घेतात.

परंतु घोरावडेश्‍वर हाइक ऍण्ड बाईक या उपक्रमामागील उद्देश लोकांनी सायकलवर किंवा चालत जाऊन पर्यावरणाला मदत करावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा, मागील दोन वर्षी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सध्या वाहनांची संख्या परिसरात कमी झाली आहे. घोरावडेश्‍वर हाइक ऍण्ड बाईक संपूर्ण नियोजनमध्ये कोअर कमिटी मेंबर्स यांनी महत्वाची भूमिका घेतली, तर संयोजनमध्ये सर्व आयसीसी स्वयंसेवक टीमने उपक्रम यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. स्वयंसेवकांचा कोअर कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.

आयसीसी घोरावडेश्‍वर हाइक ऍण्ड बाईक मार्ग :
– सायक्‍लिस्ट 11 किलोमीटर – भक्‍ती-शक्‍ती उद्यान- डॉ. डी. डी. वाय पाटील कॉलेज – मुकाई चौक – सिम्बिओसिस कॉलेज – एमसी स्टेडियम, गहुंजे
– ट्रेकिंग 4 किलोमीटर – घोरावडेश्‍वर डोंगर असा सायकलिंग आणि ट्रेकिंगचा मार्ग होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.