भयंकर! किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

शिक्रापूर -येथे किरकोळ कारणातून एका महिलेला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. याबाबत लीला सुरेश बशिरे (रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरूर, मूळ रा. शेडूरज ता. सिंधखेड राजा जि. बुलढाणा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी निलेश शिवाजी पवार व एक महिला (दोघे रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.शिक्रापूर येथील लीला बशिरे या एका मेसचे हॉटेलमध्ये केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्या होत्या.

त्यावेळी हॉटेल चालक महिला व निलेश पवार यांनी लीला बशिरे यांना तुला पैसे देणार नाही काय
करायचे कर, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत काठीने व हाताने मारहाण केली. तपास पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.