मुंबई- अभिनेत्री कंगना राणावत हिचा बहुचर्चित इर्मजन्सी हा सिनेमा 24 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणिबाणीवरचा हा चित्रपट आहे. तो स्वता कंगनाने लिहीला असून त्याचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस विरोधी प्रचाराचा भाग म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.
या चित्रपटात स्वत: कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.या चित्रपटाच्या संबंधात तिने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे की, “संरक्षक की हुकूमशहा? आपल्या राष्ट्राच्या नेत्याने आपल्याच देशातील लोकांविरोधात युद्ध घोषित केले होते त्या इतिहासातील सर्वात गडद टप्प्याचे साक्षीदार व्हा.25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या काळात गांधींनी आणीबाणी लादली होती.
A protector or a Dictator? Witness the darkest phase of our history when the leader of our nation declared a war on it’s people.
🔗 https://t.co/oAs2nFWaRd#Emergency releasing worldwide on 24th November pic.twitter.com/ByDIfsQDM7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) June 24, 2023
21 महिन्यांच्या कालावधीत जनतेच्या मूलभूत अधिकारांवर कडक निर्बंध घालण्यात आले होते.त्या विषयावर हा चित्रपट आधारीत आहे. ‘इमर्जन्सी” मध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक हे कलाकार देखील आहेत.पिंक फेम प्रसिद्ध लेखक रितेश शाह यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.