अवसरी- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया हे आजार टाळण्यासाठी गावातून स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरडा दिवस पाळू, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया हे आजार टाळू अशा घोषणा दिल्या.
या प्रसंगी सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, मुख्याध्यापक हेमंत विटकरी, शालेय पोषण आहार समितीचे व्यवस्थापक अध्यक्ष बंडेश हिंगे, आरोग्यसेवक ए. ए. सुरुशे व धामणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक ए. बी. तोडकरी उपस्थित होते. व्यसनमुक्ती आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेविषयी यावेळी उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली.