वाचन प्रेरणा दिनातून मतदारांची जनजागृती…

सोमेश्वरनगर: डॉ ए .पी .जे . अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करताना विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सोमेश्वर , सीबीएसई (ता बारामती) या शाळेने डॉ .अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन करून त्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन  भरवले व VOTE   21-OCT या इंग्रजी अक्षरांच्या आकारात विद्यार्थ्यांना वाचन करायला बसवून समाजाला मतदानाचा अधिकार व मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या कृतीतून विद्यार्थ्यांनी जनजागृती व समाज प्रबोधनाचे कार्य केले. या वेळेला सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या शिक्षिका मनिषा जांभळे यांनी वर्ग शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके दिली.

क्रीडा शिक्षक  योगेश पवार यांनी विद्यार्थ्यांना VOTE या अक्षरांच्या आकारात बसवले व विद्यार्थ्यांनी अर्धा तास वाचनाचा आनंद घेतला. या वेळी बाबासाहेबांच्या ‘वाचाल तर वाचाल’ या संदेशाची आठवण झाली. या सर्व कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन पाठक यांचे मार्गदर्शन लाभले

Leave A Reply

Your email address will not be published.