मांडवगण फराटा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवगण फराटा विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप केले. दरम्यान वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी मारकडवाडी जाऊन ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले महाराष्ट्रात ठिकठिकाणी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले.
कार्यकर्त्यांनी दिवसभर ईव्हीएम विरोधात जनजागृती केली. ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, संविधानाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. गावाच्या मुख्य चौकात ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली.
यावेळी दत्तात्रय फराटे, संभाजी फराटे, शंकरराव फराटे, बाळासाहेब फराटे, खंडेराव फराटे, शरद चकोर, बाळासाहेब फराटे, बाळासाहेब शितोळे, बाळासाहेब जगताप, शांताराम कोळपे, संदीप फराटे, विलास जगताप, वसंत फराटे, गणेश फराटे, कैलास फराटे, शेळके उपस्थित होते.