#video: भारूडाद्वारे मतदानाबाबत जनजागृती

शाहीर आसाराम कसबे व सहकाऱ्यांचा उपक्रम

पिंपरी (प्रतिनिधी) – “राष्ट्रीय कर्तव्याची भावना मनात रूजवा, हक्क मतदानाचा शंभर टक्के बजवा..” या भारूडाद्वारे शाहीर आसाराम कसबे आणि सहकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत जनजागृती सुरू केली आहे. त्यांनी त्यासाठी चार मिनिटांची व्हिडिओ क्‍लीप तयार केली आहे. ही व्हिडिओ क्‍लीप सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.

विधानसभेची निवडणूक 21 तारखेला होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, लोकप्रबोधिनी कलामंचाच्या वतीने मतदानाबाबत भारूडाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्याची व्हिडिओ क्‍लीपच लोकप्रबोधिनी कलामंचाच्या वतीने तयार करण्यात आली आहे.

शाहीर कसबे यांनी स्वत: हे भारूड लिहिले आहे. तर, शाहीर बापु पवार यांनी त्याचे गायन केले आहे. मतदान जागृतीसाठी तयार केलेल्या व्हिडिओ क्‍लीपमध्ये कसबे यांच्यासह गणेश कांबळे, सुनील क्षिरसागर, रवी कांबळे, प्रशांत तेलंग, समीर देडे यांनी सहभाग घेतला आहे. विकी देवकुळे यांनी वेशभुषेची जबाबदारी सांभाळली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.