विद्यार्थ्यांमध्ये धूम्रपानाबाबत जनजागृती

रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरणाचे नऊ शाळांमध्ये अभियान

निगडी – पिंपरी-चिंचवड शहरात रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने विविध शाळांमधून ध्रूमपानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील एकूण नऊ शाळांमधून हे अभियान राबविण्यात आले. त्यात 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या अभियानातून प्रभावित होऊन 300 विद्यार्थ्यांनी व्यसनाला निरोप दिला. डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, कमल नयन बजाज स्कूल, विद्यानंद भवन स्कूल, सेंट उर्सुला ज्युनिअर कॉलेज, नॉव्हेल हॉटेल मॅनेजमेंट, नॉव्हेल ज्युनिअर कॉलेज, सिटी प्राईड कॉलेज, मॉडर्न ज्युनिअर कॉलेज या कॉलेजमधून ध्रुमपान जनजागृतीबाबत अभियान राबविण्यात आले.

यावेळी रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा व युथ डायरेक्‍टर दिपा जावडेकर आदी सदस्य उपस्थित होते. धूम्रपान व तंबाखू यांचे विकार हे केवळ तोंड अथवा फुफ्फुसे यातच मर्यादित नसून इतर अनेक व्याधींसाठी कारणीभूत ठरतात तरी ध्रुमपान करणे टाळावे अशी जनजागृती शहरातील विविध शाळांमधून रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)