पारनेर –पुरस्कारामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल व यामधून सॉ. स्व. गुलाबराव शेळके यांचं स्वप्न साकार होणार आहे. सामाजिक बांधिलकी समोर ठेवून या पुरस्कारार्थींनीं काम केले आहे. जीवनात प्रत्येक जण आनंद जिथे शोधत असतो तिथं नसून हे सर्व पुरस्कारार्थी जे काम करत आहे त्यामध्ये आहे, हे या सर्व पुरस्कारार्थींनी त्यांच्या कामातून सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
पिंपरी जलसेन (ता. पारनेर) येथे जीएस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉ. स्व. गुलाबराव शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी हजारे बोलत होते. 1 लाख रुपये, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. हजारे म्हणाले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अनेक गोष्टी आजही शिकायला मिळाल्या.
मुक्ता दाभोळकर यांनी डॉ. दाभोळकरांच्या खुनाचा तपास व दाभोलकरांच्या खुनानंतर अशाच पद्धतीने तीन खून झालेत. चारही खुनाचे सूत्रधार सारखे आहेत. हे विशिष्ट प्रकारचे विचार करणारे लोक आहेत. हा तपास एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचला आहे. सहा वर्षांमध्ये ही उपलब्धी महत्त्वाची आहे. यावेळी जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष ऍड. उदय, शेळके शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक धात्रक, आनंदराव अडसूळ, अरुण कडू, सुमन गुलाबराव शेळके, गीतांजली शेळके, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, नीलेश लंके, माजी कुलगुरू शहाबुद्दीन पठाण, वसंत चेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पत्रकार शिवाजी शिर्के यांनी मानले.