पिंपरी, (प्रतिनिधी) – पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रमणलाल लुंकड यांना उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लुंकड यांनी नाशिक येथील सामन गाव येथे मातोश्री वृद्धाश्रमास स्वखर्चाने एका इमारतीचे बांधकाम केले असून मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगर येथील अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाला स्वखर्चाने एक इमारत बांधून दिली.
गणेश कला क्रीडा मंदिर पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, प्रख्यात तबला वादक पदमश्री पं. सुरेश तळवळकर, पद्मश्री पं. विजय घाटे, पंडित शौनक अभिषेकी,अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,सुरेखा कुडाची, म्हसोबा ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त निवृत्ती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.