पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

पुणे – क्रीडा क्षेत्रात मानाच्या असलेल्या अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना मंगळवारी पाठिंबा दर्शवला आहे.

त्यामध्ये गौरव नाटकर, नितीन कीर्तने, संदीप कीर्तने, अभिजीत कुंटे, जलजा शिरोळे, अरविंद पटवर्धन, माधव सपकाळ, जयंत गोखले, रमेश विपट, विनय मराठे, अजय मोघे, मधुरा पाटील, विराज ढोकळे, रणजीत चमले, आदित्य राऊत, युगा बिरनाळे, संजय करंदीकर, संजय अगरवाल, केदार दीक्षित, सुनील बाब्रस, सुजाता बाब्रस, शरद कुलकर्णी, शंतनू पवार, मृणालिनी कुंटे, मनोज एरंडे, अस्मिता कर्णिक आदींचा समावेश आहे.

जनताभिमुख विकासाचे पर्व यापुढेही असेच सुरू राहील असा विश्‍वास या खेळाडूंनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या योजनांमध्ये सकारात्मक दृष्टीने काय करता येईल, याचा विचार यावेळी करण्यात आला. या खेळाडूंनी पाठिंब्याचे लेखी पत्रही पाटील यांना दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)