सर्वोत्तम अंध खेळाडूचा अविनाश शिंदेला पुरस्कार

पुणे  – राष्ट्रीय अंध खेळाडूंच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता खेळाडू अविनाश शिंदे याला कोकणस्थ परिवारा तर्फे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या एका खास कार्यक्रमात हा पुरस्कार माजी राष्ट्रीय खेळाडू व सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

अविनाश शिंदे अंध खेळाडूंच्या कबड्डीचा नवोदित परंतु अव्वल खेळाडू आहे. त्याने राज्याच्या संघाकडून खेळताना राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवून दिले आहे. केवळ कबड्डीतच नव्हे तर जलतरणातही त्याने राष्ट्रीय पॅरा स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील नेवरेकर, सदस्या सोनिया नेवरेकर, प्रकाश रेणुसे, मोहन गोस्वामी, संतोष डिंबळे, अंध क्रीडापटू पांडुरंग जम्बे, माधव बिरादार, अक्षय पवळ, सतीश जाधव, जमीर शेख, राहित भरगुणे व पुणे दिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष ऍड. विजय सावंत आदी उपस्थित होते. ज्येष्ठ मुष्टियुद्ध प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच असलेले 80 वर्षांचे अरविंद ठोंबरे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.