‘अवांछित’ चित्रपटातून प्रेक्षकांना घडणार पश्चिम बंगालचे दर्शन, ‘या’ कलाकारांचा समावेश

मुंबई – मराठी प्रेक्षकांना लवकरच पश्चिम बंगालच आगळवेगळ सौंदर्य एका मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. त्या मराठी चित्रपटाचे नाव आहे अवंछित. दिग्दर्शक शुभो बासु नाग दिग्दर्शित अवंछित या चित्रपटाचे पहिले चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. येत्या ७ नोव्हेंबर पासून या चित्रपटाच्या दुसऱ्या चित्रीकरणाचे सत्र कोलकातामधील विविध विस्तीर्ण सौंदर्य ठिकाणी सुरु होणार आहे.

या चित्रपटात किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, अभय महाजन, मृण्मई गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण, सुलभा आर्य, राजेश शिंदे यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर या प्रमुख बेंगाली कलावंतांचाही अभिनय मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने बंगाली – मराठी कलावंत पडद्यावर व मागेही एकत्र काम करीत आहेत. पन्नासहून अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बेंगॉली निर्माते प्रितम चौधरी हे ‘अवांछित’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून त्यासोबतच बंगाली दिग्दर्शक शुभो बासु नाग यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.