नवी दिल्ली – सलग चार दिवस 60 हजारांहून अधिक नवे करोनाबाधित आढळल्यानंतर देशाला मंगळवारी मोठाच दिलासा मिळाला. एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्येत (53 हजार 601) लक्षणीय घट झाली. एकीकडे बाधित बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे मृत्यूदर घटत आहे.
अशातच चार दिवसांच्या कालावधीनंतर 24 तासांत नोंद झालेल्या नव्या बाधितांचे प्रमाण कमी झाल्याची घडामोड आशादायी मानली जात आहे.