नगर -पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय कुक्कटपालनसाठी पोल्ट्री फार्म मंजूर करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार आदिवासी पारधी समाजाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी आदिवासी फासे पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते. आदिवासी पारधी वंचित समाजातील गरीब व गरजू सुशिक्षित बेरोजगारांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय पोल्ट्री फार्म मंजूर करण्यास टाळाटाळ करीत आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तरी हा अन्याय दूर करुन लवकरात लवकर पोल्ट्री फार्म मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 14 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येइल असा इशारा देण्यात आला आहे.